💥पुर्णा-ताडकळस मार्गावरील कानडखेड शिवारातील बॉम्बे पुलालगत दोन दुचाकींची समोर जोरदार धडक....!


💥या अपघातात पांगरा ढोणे येथील ५८ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू : या अपघातात एक गंभीर जख्मी तर एकास किरकोळ दुखापत💥

पुर्णा (दि.०८ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-ताडकळस,पुर्णा-चुडावा-नांदेड महामार्गांवर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढले असून पुर्णा-ताडकळस महामार्गावरील कानखेड शिवारातल्या बॉम्बे पुलालगत आज देखील बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १०-१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने तालुक्यातील पांगरा ढोणे येथून हटकर वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच २२ एटी ४६९८ या स्पेल्डर प्लस दुचाकी वरुन जाणाऱ्या गंगाधर रावसाहेब ढोणे व हभप.रावसाहेब मुंजाजी ढोणे या पिता-पुत्रांना समोरुन खुजडा येथून पुर्णेकडे भरघाव वेगाने चुकीच्या दिशेने येणाऱ्या हिरो होंडा चालक अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्यामुळे या भयंकर अपघातात हभप.रावसाहेब मुंजाजी ढोणे वय ५८ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंगाधर रावसाहेब ढोणे यांना किरकोळ दुखापत झाली असून या अपघातात धडक देणारा समोरील दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मयत रावसाहेब ढोणे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथे दाखल केला असून समोरासमोर धडक देणाऱ्या दुचाकीस्वार जख्मी युवकास नांदेड येथील शासकीय रुग्नालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या