💥'परभणी ऐतिहासिक वारसा - एक चित्रमालिका' चित्रप्रदर्शन सुरू....!


💥जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते समारोप : सेलू येथे ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन💥 

परभणी (दि. 07 फेब्रुवारी) : सेलू येथील नूतन महाविद्यालयात 'परभणी ऐतिहासिक वारसा - एक चित्रमालिका' या सुनिल पोटेकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या हस्ते आज पार पडले. 


चित्रकार सुनिल पोटेकर, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे, इतिहास विभाग व संशोधन प्रमुख डॉ. उत्तम राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सुनिल हट्टेकर आणि वैशाली पोटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती गुरुवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता प्रदर्शनाचा समारोप नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून यावेळी मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतिहास संशोधन केंद्र, नूतन महविद्यालय, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून सुरु झाले आहे. हे प्रदर्शन दि. ९ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या परभणी जिल्ह्यात अनेक पुरातन वास्तू अस्तित्वात असून जिल्ह्यात चालुक्यकालीन शिल्प, भव्य मंदिरे, नानाविध शिल्पकलाकृती, मनमोहक पुष्करणी, शिलालेख विपुलतेने उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या या प्राचीन वैभवाची माहिती नवीन पिढीला व्हावी, या दृष्टीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे नूतन शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी तर ८ फेब्रुवारी रोजी शहरातील नागरिकांसाठी, ९ रोजी अन्य शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 

समारोपीय कार्यक्रमात 'परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प' या  विषयावर निवृत्त इतिहास विभाग प्रमुख तथा प्राचिन मंदिर आणि मूर्ती अभ्यासक डॉ. आत्माराम शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. उत्तम राठोड आणि प्राचार्य डॉ. शिंदे यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या