💥गावठी दारू अड्डयावर पोलीसांची धाड ; ७.४० लाखांचा मुद्देमाल (सडवा मोहा) नष्ट...!


💥अवैध गावठी हातभट्टीवर धाड टाकून तब्बल ७,४०,०००/- रुपयांचा मोहा सडवा केला नष्ट💥


(फुलचंद भगत)

वाशिम (दि.०२ फेब्रुवारी) :- दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले असून अनेक गंभीर आजार दारूच्या सेवनाने उद्भवत आहेत तसेच विषारी दारूचे प्राशन करून अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. त्यावर प्रतिबंध व्हावा यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यात अवैधपणे गावठी दारू तयार करणाऱ्या अड्डयांवर धाड टाकून अवैध धंद्या करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.


      त्याच पार्श्वभूमीवर दि.०२.०२.२०२३ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा चार्ज  मंगरूळपीर यांच्या पथकाने पो.स्टे.अनसिंग हद्दीतील मोहगव्हाण धरण परिसरात अवैध गावठी हातभट्टीवर धाड टाकून तब्बल ७,४०,०००/- रुपयांचा मोहा सडवा नष्ट केला आहे. मोहगव्हाण धरणाचे कडेला ठिकठिकाणी खड्डे खणून त्यावरील दगडी भट्टयांमध्ये २०० लीटरच्या ३४ टाक्या ६८०० लिटर सडवा मोहा, १५ लिटरच्या ८ पिंपामध्ये १२० लिटर सडवा मोहा व ३२ चालू भट्टीमध्ये प्रत्येकी १५ लिटर प्रमाणे ४८० लिटर सडवा मोहा असा एकूण ७४०० लिटर सडवा मोहा अंदाजे किंमत ७.४० लाख रुपयांचा सडवा मोहा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. पो.स्टे.अनसिंग येथे सदर प्रकरण दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा चार्ज मंगरूळपीर श्री.जगदीश पांडे यांचे पथक पोउपनी.बुद्धू रेघीवाले व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा व मंगरूळपीर पथक तसेच RCP पथक कारंजा यांनी पार पाडली. नागरिकांनी अवैध धंद्याविरोधातील माहिती / तक्रार नियंत्रण कक्ष, वाशिम यांना द्यावी त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या