💥जाग्रत पालक सुदृढ बालक या योजनेअंतर्गत कै.किशनराव चव्हाण शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी...!


💥त्यामध्ये 73 विद्यार्थिनी तर 97 विद्यार्थी एकूण 170 विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतला💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर आज ग्रामीण रुग्णालय जिंतूर अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जागृत पालक सदृढ बालक या योजनेअंतर्गत जिंतूर येथील कै. किशनराव चव्हाण विद्यालयात विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये 170 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले त्यामध्ये 73 विद्यार्थिनी तर 97 विद्यार्थी एकूण 170 विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतला.

या कामी  जिंतूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. रवींद्र राऊत डॉ. प्रतिभा बकान तसेच आरोग्य सेविका मुक्ता राठोड यांनी कै. किशनराव चव्हाण विद्यालयात विद्यार्थीनी व  विद्यार्थ्यांची शारीरिक चौकशी करून तपासणी केली यावेळी शाळेचे शिक्षक उबाळे सर, कुलाल सर, बुधवंत सर, कोंडावार मॅडम व घोगरे सर तसेच वाजीत भाई उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या