💥जिंतूर येथे बाळासाहेबांची शिवसेना जनसंर्पक कार्यालयांचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन.....!


💥जिंतूर तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी केली💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर - सेलू मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिंतूर शहरातील जालना महामार्गावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले. पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.जिंतूर शहरात सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, नागरिकांनी आपल्या समस्या बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालयात येऊन मांडाव्यात. असे अवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे म्हणाले की, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्हा उपप्रमुख प्रल्हादराव होगे पाटील, युवा नेते संदीप आघाव, अंकुश राठोड, राजेश चक्कर बालासाहेब चक्कर, सौ. अक्षता चक्कर पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. लवकरच जिंतूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळासाहेब ठाकरे व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते फीत कापून संर्पक कार्यालयाचे  उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंकुश राठोड, जिल्हा प्रमुख श्रीव्यंकटराव शिंदे ,अक्षता चक्कर, प्रल्हादराव घुगे उपजिल्हाप्रमुख, राजेश चक्कर, राजाभाऊ चक्कर, दिलीप जाधव, निलेश चव्हाण, बाळासाहेब चक्कर विजय टाकरस चिंतामणी देशमुख, अंकुश घुले, लाठकर, आधी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या