🌟परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात फॅशन शो संपन्न....!


🌟संस्थेचे सचिव विजयराव जामकर यांनी फॅशन शो पाहताना गुणीजन विद्यार्थीनींचे विशेष अभिनंदन केले🌟

    फॅशन ही मानवी मनाची मुळ प्रवृत्ती. आहे पेक्षा अधिक सुंदर असावं या भावनेला विधायक कृतीशीलतेची जोड मिळाल्यास माणसाचं जगणं अधिक सुसह्य आणि सुंदर बनतं,याच दर्शन विद्यार्थीनींनी सादर केलेल्या कलापूर्ण आविष्कारातून आनंद,आणि उत्साहाच उधाण रसिक प्रेक्षकांना समाधान देणारे राहीले आहे.देशविदेशातील माणसाच्या विविधतेत ही सुंदरतेची साधना, मानवी मनाच्या एकरुपतेची खरी ओळख असल्याचे मत नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव विजयराव जामकर यांनी फॅशन शो पाहताना व्यक्त करित गुणीजन विद्यार्थीनींचे विशेष अभिनंदन केले.

                कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी सांस्कृतिक विभाग आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कमलोत्सव -2023 निमित्त डिप्लोमा,बी.व्होक,एम.व्होक,

फॅशन टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फॅशन शो प्रसंगी विजयराव जामकर यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले. या वेळी सौ.वसूंधराताई जामकर,सौ.नेहाताई जामकर,  जामकर,सौ.राजवीराताई जामकर, राजपालभाऊ जामकर, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले,प्रा.मनिष देशमुख आदींची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन फॅशन शो चे उदघाटन करण्यात आले.प्रसंगी मान्यवरांचे ही स्वागत करण्यात आले.

          महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेला फॅशन शो आधुनिक आणि प्रगत जगाची ओळख करून देणारा असून विद्यार्थीनींनी घेतलेल्या  परिश्रमाचं कौतूक करित प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले सरांनी परभणी करांसाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे सदस्य राजपाल जामकर यांनी अभिनंदन केले.

           प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य डॉ संगीता आवचार,प्रा.प्रियंका राऊत,प्रा.पुजा कत्ते,प्रा.अर्चना लाहोटी,प्रा.मुमताज खान,प्रा.रुपाली काळे यांचे यशस्वीतेसाठी योगदान लाभले.

    फॅशन शो साठी साज बुटीक च्या सौ.अनिता सामाले यांनी पारितोषिक आणि मेकप, न्यू लूक ब्युटीसीएन च्या मनिषा चव्हाण यांनी मेकप अणि विद्यार्थीनींना या पुढे मेकप साठी ५०% सवलत असे प्रायोजकत्व स्विकारत योगदान दिले.

          फॅशन शोच्या निमित्ताने विविध स्त्रियांचे मॉडेल ,वेशभूषा ,केशभूषा मेकअप च्या साह्याने देश विदेशातील स्ञियांच्या प्रतिमा सादरीकरणात पल्लवी हिवरे,धनश्री खाकरे, सविता राऊत, सुमय्या तब्बसूम ,सानिया महविश, अर्शीया शेख, श्रद्धा गवळी, वैशाली इखे, निकिता येलपूरकर, अर्पिता तांबे, रागिनी पूरनवार, प्राची पांचाळ, मुस्कान खान,सपना चव्हाण, मिरजा मदिया फिरदोस ,सना खान, कांचन काळे ,पल्लवी मुळी, श्रुती ढवळे ,रोहिणी मुंढे,श्रद्धा पटवे, अनघा संगेवार, आकांक्षा साळवे,आरती भराडे, श्रद्धा खिस्ते ,अनघा संगेवार,आकांक्षा साळवे ,प्रांजल आढागळे, सानिया शेख, वैभवी जंगलपुरे,निकिता सृष्टीकर, शिवानी वळसे ,कांचन गलांडे यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुजा कत्ते यांनी करत आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या