💥पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाने केला राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध....!


💥राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना : राज्यातील पत्रकार संतप्त💥

पुर्णा (दि.१० फेब्रुवारी) - राज्यात सर्वत्र पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या असून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची समाजकंठकांनी रिफायनरी विरोधात बातम्या लावल्याच्या द्वेषातून महिद्रा थार गाडीखाली चिरडून त्यांची निर्घृण हत्या केल्या मुळे राज्यातील पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी पुर्णा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले यांच्या नेतृत्वाखाली व जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येथून तहसिलदार टेमकर व नायब तहसिलदार कोकाटे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून या अमानवीय कृत्याचा निषेध केला.

तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की महाराष्ट्रात सभ्य आणि सुसंस्कृत भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही पोलिस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. 

या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा कार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकात वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे..

या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे.. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत... राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.

हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे.. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीन भविष्यात प्रयत्न व्हावेत असे देखील निवेदनात म्हटले असून निवेदन देते वेळी पुर्णा तालुका पत्रकार संघाचे दौलत भोसले,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड,चौधरी दिनेश,गजानन हिवरे,जेष्ठ पत्रकार मो.अनिस बाबूमियां,मो.अलिम,मोहन लोखंडे,दिपक साळवे,ॲड.डाखोरे साहेब आदींची उपस्थिती होती.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या