💥नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे प्रा.डॉ.पी.एल.कराड व प्राचार्य अतुल दुबे यांचा सत्कार....!


💥यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल पॅनल प्रमुख प्रा डॉ पी एल कराड यांचा व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.


         नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतीने जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार विजयी झाले आहेत. त्याबद्दल पॅनल प्रमुख प्रा डॉ पी एल कराड व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शाल, श्रीफळ,फेटा बांधून, पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, पाटलोबा मुंडे, माजी सरपंच हरिष नागरगोजे, नवनाथ फड, फड सर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या