💥गॅस सुरक्षीतते बाबत ग्राहकांनी नेहमी सतर्क रहावे ; बिजय पाठी यांचे प्रतीपादन


💥असे आव्हान चितलांगे इंण्डेणतर्फे आयोजित सुरंक्षा शिबीरामध्ये बिजय पाठी यांनी केले💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर :-गॅस सुरंक्षीतता ही एलपीजी ग्राहकांच्या आयुषातील सर्वांत महत्वाची गोष्ट असून सिलेंडरमुळे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरंक्षानियमांचे पालन करावे असे आव्हान चितलांगे इंण्डेणतर्फे आयोजित सुरंक्षा शिबीरामध्ये बिजय पाठी (मंडल एलपीजी सेल्स प्रमुख इंण्डेण ऑयल कॉपोरेशन नागपुर) यांनी केले.तसेच चितलांगे इण्डेण वर्षभर ग्राहकांच्या हितास्तव घेतअसलेल्या कार्यक्रमाची प्रशंषा केली.


याप्रसंगी चितलांगे इण्डेणच्या अद्यातव अशा नविन गॅस गोडाऊनचे शुभारंभ करण्यात आला याकार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणुन फिल्ड ऑफिसन निलेश ठाकरे, मुख्याधिकारी सतिष सेवदा,पोलिस निरिक्षक, सुनिल हुड,रमेशचंद्रजी नावंदर ,सतीषचंद्रजी बाहेती,बाहेती काकीजी, सरपंच फिरोजभाई, श्यामभाऊ खोडे, सुनिलभाऊ मालपाणी, डॉ.रत्नपारखी, विनोद जाधव, नंदलाल जाखोटिया,मानिकरावजी सोनोने, नरेंद्र बजाज इत्यादी मान्यवर मंचकावर होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ बुके व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.याप्रंसगी सर्व मान्यवरांचे भाषणे संपन्न झालीत.कार्यक्रमाचे संचालन श्री पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेशभाऊ नावंदर यांनी केले.याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्त्ये पदाधिकारी, मित्र परीवार,असंख्य ग्राहक, जिल्ह्यातील गॅस वितरक तसेच पत्रकार विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक शेकडोच्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी मानोरा रोडवर स्व.मथुराबाई चितलांगे यांच्या स्मृती पित्यर्थ पानपोई उद्घटन सुध्दा संपन्न झाले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या