💥शिक्षण विभागाने सोडला सुटकेचा निःश्‍वास आयुक्तांचा दौरा रद्द : उद्याची सुट्टी घेता येणार...!


💥शिक्षण आयुक्त मांढरे हे दि.02 व 03 फेबु्रवारी रोजी परभणी जिल्हा दौर्‍यावर येणार होते💥

 परभणी (दि.01 फेब्रुवारी) : राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांचा बुधवारी (दि.01) सकाळी संभाव्य दौरा रद्द झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

          शिक्षण आयुक्त मांढरे हे 2 व 3 फेबु्रवारी रोजी परभणी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत, असे पत्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी सर्व गट शिक्षणाधिकार्‍यांना 24 जानेवारी रोजी पाठवले होते. त्यातून आपल्या कार्यालयाची व तालुकांतर्गत कोणत्याही शाळेस ते अचानक भेट देवून तपासणी करतील, असे स्पष्टपणे नमूद केले होते. आपण वेळेवर कार्यालयात उपस्थित रहावे, अभिलेख अद्ययावत ठेवावे, असे निर्देश देवून या कालावधीत कोणत्याही कर्मचार्‍याची रजा मान्य करु नये, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व कर्मचार्‍यांना आपल्या स्तरावरुन सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले होते. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अक्षरशः दक्ष झाली.

           2 फेबु्रवारी रोजी उर्सानिमित्त सुट्टी असूनही हजेरी लावावी लागणार, हे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागासह बहुतांशी मुख्याध्यापकांसह शिक्षक व कर्मचारी हिरमुसले होते. त्यात आयुक्त मांढरे हे अचानक तपासणीतून काय तपशील मागतील, कोणती परीक्षा घेतील, याचा नेम नसल्याने सारे भांबावले होते, अस्वस्थ होते. यातच बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी पुन्हा एक पत्र काढून शिक्षण आयुक्तांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षण विभागासह सार्‍यांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या