💥परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे एलआयसी ऑफिस समोर आंदोलन....!


💥हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी💥


परभणी (दि.०६ फेब्रुवारी) - परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मा..राज्यमंत्री आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेडीयम कॉम्प्लेक्स समोरील एलआयसी कार्यालया समोर अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पडदा पास करणारा हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाखाली चौकशी करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.  

 यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा मा.राज्यमंत्री आ.सुरेश वरपूडकर नदीम इनामदार मा.महापौर भगवान वाघमारे मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख रामभाऊ घाडगे सुहास पंडित तुकाराम साठे आदी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या