💥परभणी येथील रामकृष्ण नगर येथे जिल्हास्तरीत अधिवक्ता परिषदेची बैठक संपन्न....!


💥पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेची कार्यकारीनी घोषित : तालुका महामंत्री पदावर ॲड.रोहिदास जोगदंड यांची निवड💥


💥तर पुर्णा तालुका अधिवक्ता पालक पदावर जेष्ठ विधिज्ञ ॲड.शिवप्रसाद सोनी तर तालुकाध्यपदी ॲड.सोमनाथ नागठाणे💥

परभणी/पुर्णा (दि.१८ फेब्रुवारी) - परभणी येथील रामकृष्ण नगर परिसरातील जनकल्याण पतसंस्था सभागृहात आज शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास अधिवक्ता परिषदेच्या देवगिरी प्रांत महामंत्री ॲड.संगीताताई बागूल यांच्या अध्यक्षतेखाली अधिवक्ता परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या जिल्हास्तरीय अधिवक्ता परिषदेच्या बैठकीत देवगिरी प्रांत सहमंत्री ॲड.अतूल काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या बैठकीत पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेची कार्यकारीनी घोषित करण्यात आली पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेच्या पालक पदावर जेष्ठ विधिज्ञ ॲड.शिवप्रसाद सोनी यांची तर पुर्णा तालुका महामंत्री पदावर ॲड.रोहिदास निवृत्तीराव जोगदंड (पाटील) यांची तर तालुकाध्यक्ष पदावर ॲड.सोमनाथ नागठाणे यांची निवड देवगिरी प्रांत सहमंत्री ॲड.अतूल काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली तर सदस्य पदावर ॲड.वैजनाथ लांडे,ॲड.सुधाकर चुनोडे,ॲड.नरेंद्र भारती,ॲड.सचिन जोगदंड,ॲड.दिनेश काळे,ॲड.शैलेश पुंडगे,ॲड.शिवराज कऱ्हाळे,ॲड.बालाजी लोखंडे,ॲड.अमोल कदम,ॲड.संतोष कदम,ॲड.दिपक सोनकांबळे,ॲड.गोपाळ डाखोरे,ॲड.प्रभाकर मोरे,ॲड.सोविएत जोगदंडॲड.सचिन गायकवाड यांची निवड करण्यात आली.


अधिवक्ता परिषदेच्या या जिल्हास्तरीय बैठकीस जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी अधिवक्ता बांधवांनी सहभाग नोंदवला होता.पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेच्या तालुका महामंत्री पदावर ॲड.रोहिदास जोगदंड,पालक पदावर ॲड.शिवप्रसाद सोनी व तालुकाध्यक्ष पदावर ॲड.सोमनाथ नागठाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष तथा जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनीचे संचालक/संपादक पत्रकार चौधरी दिनेश, पुर्णा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत भोसले,जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी जगदीश जोगदंड सर,सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर,जेष्ठ पत्रकार विजय बघाटे सर,आडत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदानी,भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत भिमराव कदम,भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष  डॉ.अजय ठाकूर,पत्रकार केदारउर्फ बाळू पाथरकर,अभिनव विद्या प्रसारणी सभेचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी आनंद अजमेरा,पत्रकार अनिस बाबुमियाँ,पत्रकार मुजीब कुरेशी,पत्रकार सुशिल गायकवाड,पत्रकार दिपक साळवे,पत्रकार आनंद ढोणे,पत्रकार अतूल शहाणे यांनी अभिनंदन केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या