💥आध्यात्मा मुळे जीवन सुखी व आनंदी होते - हभप.माऊली महाराज मुडेकर

  


💥तालुक्यातील गणपूर येथे बळीरामजी महाराज गणपूरकर यांचे पुण्यतिथी निमित्य आयोजित किर्तनात ते बोलत होते💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 आध्यात्ममुळे जीवन सुखी व आनंदी  होते त्यामुळे माणसाने  आपल्या जीवनात करावे. त्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब  करावा असे आवाहन  हभप.माऊली महाराज मुडेकर यांनी केले ते जिंतूर तालुक्यातील गणपूर येथे बळीरामजी महाराज गणपूरकर यांचे पुण्यतिथी निमित्य आयोजित केलेल्या कीर्तनात बोलत होते. समुद्राच्या पाण्याला जसा आंत नाही तसा भगवानताच्या कृपाळू  पणालाही आंत नाही हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कीर्तणासाठी शुक सन का दिकी उभारीला बाहो,परीक्षिती लाहो दिसा साता हा अभंग निरूपणासाठी घेतला होता.सदरील कार्यक्रमाचे आयोजन वासुदेववजीर,प्रा.डॉ.प्रभाकर वजीर, प्रा.रामभाऊ वजीर, पोलीस पाटील पंढरीनाथ वजीर,लक्षिमनरावं  वजीर  यांनी केले होते.पुढे बोलताना महाराज म्हणाले की प्रपंचायत सुखी राहायचे अनाथाना मदत करावे तसेच व्यसनापासून मुक्त व्हावे असे मत व्यत केले.                      

मृदंगचार्य  बापूराव गणपूरकर  तर गायक मंडळीत रामभाऊ वर्नेकर, मोकिंदा मांडवेकर, विठ्ठलरावं निवळीकर, माऊली करावंलीकर, जानकीराम घाटुळ, उद्धव मुडेकर,भगवान  मस्के, अशोक लेवडे, गजानन  पिंपरीकर, महादू कोक्कर यांचा समावेश होता.   कीर्तणासाठी संचालक बापूराव आळसे, माजी जी. प. सदस्य प्रभाकर वाघीकार, नारायण चांदणे, बाळासाहेब मोहिते, उत्तमराव मुटकुळे, दत्तराव  पाटील, सुधाकर कुकडे, मारोती डुकरे, तुकाराम डुकरे , संतोष मुंजाळ,मधुकर  चिंचोलीकर, माणिकराव कुकडे, रामा ढकर्गे, डॉ बकान उपास्तित होते.                   यशस्वीतेसाठी   प्रा. संदीप वजीर,प्रा.अनिल गणपूरकर, अर्जुन वजीर, रमेश गणपूरकर, नामदेव काष्टे, संजय वाडेकर यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या