💥जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ लाख ३३ हजार रुपयांचा प्रतिबंधीत अवैध गुटखा जप्त....!


💥अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या ३ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल : आरोपी मुद्देमालासह ताब्यात💥

परभणी/जिंतूर : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिसांनी देवगाव फाटा-सेलू मार्गावरील गिरगाव पाटीजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेला मानवी आरोग्यास अपायकारक अवैध गुटखा चोरट्या पध्दतीने वाहनातून घेऊन जात असतांना चारठाणा पोलिसांनी वाहनासह एकूण ५ लाख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई शनिवारी दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ०८-१५ वाजेच्या सुमारास केली आहे. 

सदरील अवैध गुटखा मंठा येथून सेलू कडे टाटा ए. वाहन क्रमांक एम.एच.२२.एन.२४४८ या वाहनातून जात असल्याची गुप्त माहिती चारठाणा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पो.नि.बालाजी गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी मंठा येथून सेलूकडे जाणाऱ्या सदर वाहनास गिरगाव पाटील जवळ थांबविले व वाहनांची झडपी घेतली असता या वाहनात राम दगडूबा राखुंडे रा देऊळगाव ता.सेलू व कृष्णा मदन मिसाळ रा.मंठा जि.जालना हे दोघे सदर वाहनातून शासनाने बंदी घातलेला व मानवी आरोग्यास घातक असलेला गुटखा घेऊन जात असताना रंगेहात आढळून आले या वाहनात गोवा,राजनिवास,व सुगंधी पान मसाला,विमल पान मसाला, आर.एम.डी गुटखा,सुगंधी तंबाखू असा एकूण२लाख१३हजार रुपयांचा गुटखा व२०हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ३३ हजार ८० रुपयाचा ऐवज चारठाणा पोलिसांनी जप्त केला आहे

दरम्यान ही कारवाई चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, पोहे.कां.रामकिसन कोंडरे, पोलीस नाईक मगरे,शेख जिलानी,पवन राऊत,चालक भालेराव,मी सदर कारवाई केली दरम्यान शेख जिलानी यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम दगडोबा राखुंडे,व कृष्णा मदन मिसाळे,सेलू येथील धापसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पोलिसांनी राखुंडे व मिसळ यांना अटक केली आहे

याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४, भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने हे करीत आहे दोघा आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील पोलिसांनी अटक केलेल्या राम दगडूबा राखुंडे व कृष्णा मदन मिसाळ या दोन आरोपींना रविवारी (दि.१९) सेलू न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या