💥पत्रकार हत्या प्रकरणी मराठी पत्रकार परिषदेने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट💥
मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची निघृण हत्त्या करणार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी आज मंगळवार दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
रिफायनरीला विरोधाची भूमिका घेणारे शशिकांत वारिशे यांनी एक बातमी दिल्यामुळे त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली या बातमीचा राज्यभर निषेध होत असतानाच किरण नाईक यांनी तातडीने भेट घेऊन या प्रकरणी सरकारने लक्ष घालून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.. त्यावर या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे....
0 टिप्पण्या