💥पुर्णेतील श्री.गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाकडून आयोजित शैक्षणिक सहल संपन्न...!


💥सामाजिक भान व्हावे तसेच सामाजिक प्रश्नाविषयी जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने कुष्ठधामला नेण्यात आली होती सहल💥 

पुर्णा :- श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णाच्या समाजशास्त्र विभागाकडून नेरली येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीतून विद्यार्थ्यांना सामाजिक भान व्हावे तसेच सामाजिक प्रश्नाविषयी जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने कुष्ठधामला सहल नेण्यात आली होती या मध्ये 30 विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले होते.

यावेळी तेथील कुष्ठरोग्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे जगणे, राहणे, त्यांना मिळत असलेल्या सुविधा अशा विविध बाबींवर प्रश्न उत्तरे करून सर्वेक्षण करण्यात आले, तसेच तेथे फळ वाटप करून त्यांच्याशी हितगुज करण्यात आली. समाजशास्त्र विभागाकडून आयोजित या सहलीत सामाजिक अंगाने अध्ययन करण्यात आले यासाठी प्राचार्य डॉ के राजकुमार उपप्राचार्य संजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समाजशास्त्र विभागातील डॉ अंबिका चोंडे यांनी सहलीचे आयोजन केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या