💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील बाभूळगावात लहाडी पौर्णिमा निमित्ताने यात्रेला प्रारंभ...!


💥धडधगत्या निखाऱ्यावरून चालन्याची शेकडॊ वर्षाची परंपरा💥 


✍️शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील यडोबा महाराज यांच्या यात्रेला दि ०५/०२/२०२३पासून सुरुवात झाली आहे.ह्या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक भक्त यडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी येतात या यात्रेचे विशेष म्हंजे भाविक भक्त आपआपला नवस फेडण्यासाठी लहाडी पौर्णिमेच्या दिवशी आपला नवस फेडायला येतात धडगत्या निखाऱ्यावरून चालत भाविक नवस फेडतात या निखाऱ्यावरून जातांना भाविकांना काही ईजा देखिल होत नाही ४ बाय ६ चा खड्डा करून त्यामध्ये जळतन टाकून दिवस भर ते जाळून संध्याकाळी त्या निखाऱ्यावरून जातात व नवस फेडतात गेल्या  शेकडॊ अनेक वर्षा पासून हि परंपरा चालु आहे मात्र कोणत्याही भाविकांना यातून ईजा झालेली नाही  यात्रेच्या निमित्ताने गावातील सर्व लेकीबाळी येडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात गावात यात्रा देखिल भरली यात कटलरी कापड दुकानं मिठाईचे दुकानं आकाश पाळले यांच्या आदी दुकाने यात्रत लागले आहे. 


बाभूळगाव येथील यडॊबा महाराजाचे मंदिर हें प्राचीन काली दगडी बांधकामत केले आहे आज संस्थानच्या वतीने लहाडी पौर्णिमा निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज लहाडी पौर्णिमा निमित्ताने हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे  व महिला बालकल्याण सभापती रुपालीताई  गोरेगावकर व अनिल पतंगे ह्या लोकप्रतिनिधी यडोबा महाराजांचे दर्शन घेतले.सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील श्री येडोबा यात्रेला आज  ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला  आहे.यात्रेनिमित्त अभिषेक, महापूजा, कबड्डी व कुस्ती दंगल आदी कार्यक्रमांचे ह आयोजन करण्यात आले आहे. व बाभूळगावसह पंचक्रोशीतील भाविक यात्रेत सहभागी होऊन श्री येडोबाचे दर्शन घेतात बाभूळगाव येथील श्री येडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी लहाडीउत्सव साजरा केला जात असून, यानिमित्ताने यात्रा भरविली जाते.यावर्षी ५ फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होत आहे. ५ फेब्रुवारी रोजी हाटे ५वाजेदरम्यान 'श्रीं'चा अभिषेक होणार असून, सायंकाळी ७ वाजता लहाडीचा कार्यक्रम झाला होता त्यानंतर . ६ फेब्रुवारी रात्री कबड्डीचे सामने व ७ फेब्रुवारी रोजी कुस्तीची दंगल होणार आहे. कुस्ती दंगलीचे उद्घाटन सरपंच केतुल हनवते तर कबड्डी सामन्याचे उद्घाटन दीपकराव वडकुते यांच्या हस्ते होणार असल्याचे महोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले.या यात्रेत गोरेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या