🌟जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेतही सेलूतील श्री.के.बा.विद्यालय,जी.प.शाळा लोणी प्रथम....!


[सेलू: येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात जिल्हास्तरासाठी परसबागेची पाहणी केल्यानंतर लेखाधिकारी अमोल आगळे,अधीक्षक त्र्यंबक पोले,गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत,मुख्याध्यापक सुभाष नावकर,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,संजय धारासुरकर,बालासाहेब हळणे, योगेश ढवारे आदी]

🌟अथक परिश्रमातून पिकवला भाजीपाला🌟

सेलू (दि.24 फेब्रुवारी) - तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेतही येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.यामुळे सेलूचे नाव जिल्हा स्तरासोबत आता राज्य पातळीवर झळकले आहे.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बु ता.पाथरी या शाळेचाही प्रथम क्रमांक आला असून विभागून दोन्ही शाळांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव दिले आहे.या माध्यमांतून राज्यातील शाळांमधून परसबागेच्या माध्यमातून ताजा भाजीपाला पिकवला जाऊन त्याचा वापर पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पोषक तत्वे मिळावीत या उद्देशाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग स्पर्धा आयोजित केली आहे.यामध्ये तालुकास्तरावर ही स्पर्धा पार पडली.त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धाही पार पडली.यामध्ये श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बु ता.पाथरी यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला.तर जिल्हा स्तरावर जी.प.प्रा.शा तीवठाणा ता.सोनपेठ या शाळेचा द्वितीय क्रमांक आला तर जी.प.प्रा.शा मैराळ सावंगी ता.गंगाखेड या शाळेचा तृतीय क्रमांक आला आहे.या शाळांना अनुक्रमे 10 हजार,7 हजार आणि 5 हजार असे बक्षीस देखील देण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षणाधिकारी विट्ठल भुसार आणि लेखाधिकारी अमोल आगळे यांनी याबाबत प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.

जिल्हास्तरावर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लेखाधिकारी अमोल आगळे,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक त्र्यंबक पोले आदींसह प्रगतिशील शेतकरी आदींनी परसबागेची पाहणी केली श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या यशाबद्दल सेलूचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख सय्यद सरदार,विजय चिकटे,मुख्याध्यापक तथा सेंद्रिय शेती तज्ञ भुजंग थोरे,मनीषा धापसे आदींसह श्री.के.बा.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी,सचिव महेशराव खारकर,सहसचिव अभय सुभेदार,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,जयंत दिग्रसकर,ऍड.किशोर जवळेकर,ललित बिनायके,प्रवीण माणकेश्वर, डॉ प्रवीण जोग,विष्णुपंत शेरे,अशोक चामणीकर,मुख्याध्यापक सुभाष नावकर,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या