🌟गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा रूमणा येथे छत्रपती शिवजयंती उत्साहात....!


🌟या कार्यक्रमात प्रमुख बालवक्ता म्हणून कु.कल्याणी कदम, प्रीती कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले🌟

गंगाखेड (प्रतिनिधी) - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री ज्ञानोबा रावसाहेब कदम, तसेच या कार्यक्रमात प्रमुख बालवक्ता म्हणून कु. कल्याणी कदम, प्रीती कदम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा.योगीराज बदने सर यांनी शिवचरित्र व आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी अध्यक्षीय भाषणात ज्ञानोबा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप भाषन श्री मंचकराव कदम यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच श्री जगन्नाथ कदम, उपसरपंच   सुवर्णताई कदम, तंटामुक्ती अध्यक्ष कोंडीबा कदम, शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष रामभाऊ चमकुरे, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश कदम यांनी केले.या कार्यक्रमासाठी गावातील पुरुष महिला बालगोपाल व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुळजाभवानी मित्र मंडळ  व जय गुरुदेव वारकरी शिक्षण संस्था वृंदावन जवळा यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या