💥पुर्णेतील रेल्वे स्थानक क्रमांक एकवर मजदूर युनियनच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेचे कायमस्वरूपी अनावरण....!


💥यावेळी मुख्य कर्मिदल नियंत्रक सी.एच.सुरेश,हर्षवर्धन बागुल,बाळू गायकवाड,शेख कैसर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती💥 


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) : पुर्णा येथील रेल्वे स्थानक क्रमांक एकवर मजदूर युनियनच्या वतीने आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक 'जानता राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेचे कायमस्वरूपी अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख तथा पुर्णा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विशाल कदम,जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी शैक्षणिक/सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व जगदीश जोगदंड सर यांच्यासह रेल्वे मजदुर युनीयनचे पदाधिकारी/कार्यकर्ते रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

      या संदर्भात सविस्त वृत्त असे की येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मजदूर युनियनच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विशाल कदम व जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी शैक्षणिक/सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व जगदीश जोगदंड सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

           शिवजयंती च्या मूहूर्तावर भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्य कर्मिदल नियंत्रक सी.एच. सुरेश, हर्षवर्धन बागुल, बाळू गायकवाड, शेख कैसर, दिलीप सोनावणे, गौतम काळे, रोहित मित्रे, प्रभाकर चुनोडे, किरण मोरे, मोहम्मद निसार, दीपक कऱ्हाळे, अमीर अली, आतिश खडके, अमोल नाईकनवरे, शेख इम्रान, राजेश्वर प्रसाद, चंद्रपाल राजभोज, मुजाहीद खान, बी. माधव, प्रनील कापुरे, राजेश बामानपल्ले, महेश देवतळे, प्रदीप वाढे, सोनाजी डी. राहुल खंडागळे, गौरव हडोले, अभिषेक दाडे , तुकाराम काळे, विनोद काळे, प्रवीण कांबळे, किरण पोटफोडे, विजय ठाकूर, साईबाबा अण्णा, अनिल साळवे, विलास खरे, राहुल जोंधळे, सचिन वाघमारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हर्षवर्धन बागूल यांनी केले. रोहित मित्रे यांनी आभार मानले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या