💥बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नौकरी मिळविणाऱ्या महिला शिक्षिकावर गुन्हा दाखल....!


💥मुख्य आरोपी महिला शिक्षिकेसह तिघांवर गुन्हा दाखल💥

(फुलचंद भगत)

वाशिम  :- शासनाने दिव्यांगाच्या प्रमाणपत्रात बोगस बाजीस आळा बसावा म्हणून युडीआयडी दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र सुरू केले आहे. परंतू यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगर परिषद मधील शाळेत शिक्षीका म्हणून कार्यरत महिला शिक्षिका जी दिव्यांग नसतांनी सुध्दा तिने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रा आधारे अपंग अनुशेष भरतीमधून २००९ मध्ये नियुक्ती मिळविली असून तिच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी. म्हणून फिर्यादी नामे मयुर सदानंद मेश्राम वय ३५ वर्षे व्यवसाय-उपसरपंच रा.हिवरा (बु), ता.नांदगाव खंडे, जि. अमरावती यांनी शिक्षण विभागाला तक्रार केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने आदेश दिले होते.या प्रकरणातील आरोपी महिलेने वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दि. ०२/०९/२०२२ रोजी दिव्यांग यु.डी.आय.डी. ऑनलाईन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत तिने ऑफलाईनचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, बोगस आधारकार्डच्या आधारे वाशिम जिल्हयातील रहिवाशी दाखवून त्या आधारे ऑनलाईनचे बोगस यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र संबंधीत विभागाला सादर केले. त्या सर्व प्रमाणपत्राची रूग्णालयामार्फत पडताळणी केली असता सर्व कागदपत्र हे बोगस असल्याचे आढळून आले व तसे जिल्हा रूग्णालयाने लेखी पत्राद्वारे कळविले.

पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे सदर बोगस दिव्यांग महिला शिक्षीका हिचे विरूध्द लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनविणाऱ्या टोळीमधील मुख्य सुत्रधारच ही आरोपी महिला शिक्षिकाच आहे व नगर परिषदमधील शिक्षण विभागातील अतुल वानखडे व राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा, पांढरकवडा येथील शिक्षक नहुष ज्ञानेश्वर दरवेशवार हे सुध्दा सहभागी आहेत,” अशा फिर्यादीचे तक्रारीवरून मुख्य आरोपी नामे महिला शिक्षिकेसह २) अतुल वानखडे, रा. तपानवाडी, यवतमाळ ३) नहुष ज्ञानेश्वर दरवेशवार, रा.लेआऊट वडगाव, यवतमाळ यांचे विरूध्द सदरचा गुन्हा ४२०,४६७,४६८,४७१,३४ भादंवि प्रमाणे दाखल केला असून तपास परिविक्षाधिन पोलीस ऊपनिरीक्षक सचिन गोखले हे करीत आहेत...

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या