🌟जनविरोधी अर्थसंकल्पाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने...!


🌟जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग नोंदवला🌟

परभणी (दि.२८ फेब्रुवारी) - परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोदी सरकारच्या जन विरोधी केंद्रीय अर्थसंकल्पाचा धिक्कार करून तीव्र निदर्शने करत मोदी सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने 2023 च्या बजेटमध्ये शेतकरी कामगार व सर्व सामान्य जनतेला  देशोधडीला लावून कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, रेशन, जनहिताच्या अनेक योजना बाबतीत  बजेट मध्ये कपात करुन श्रमिक जनतेवर प्रचंड टॅक्स लावला आहे. 


याचा धिक्कार करून कॉम्रेड उद्धव पौळ,कॉम्रेड रामेश्वर पौळ, कॉम्रेड लिंबाजी कचरे पाटील, यांनी मोदी सरकार विरोधात घणाघाती प्रहार करून भाषणे केली.अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, उद्धव पौळ, दत्तुसिंग ठाकूर, लिंबाजी कचरे पाटील, दिपक लिपणे, नसिर शेख, अशोक बुरखुंडे, रामराजे महाडिक, अमन जोधळे, रमेश साठे, इब्राहिम चाचा,बालाजी पौळ, रंगनाथ डंबाळे, श्रीकृष्ण पौळ, दादासाहेब देशमुख, धोडींतात्या पौळ, शेख बाबू, आदींसह सेलु, मानवत, पाथरी, पुर्णा, परभणी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या