💥पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृती कला महोत्सवात कु तेजस्विनी ढोणे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम...!


💥तर वक्तृत्व कला व गायन स्पर्धेत अंबिका चव्हाण तसेच पूजा ढोणे यांनी सहभाग नोंदविला होता💥

पूर्णा (वार्ताहर) येथील संस्कृती महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृती कला महोत्सव 2023 मध्ये श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विविध स्पर्धा मध्ये भाग घेतला व बक्षिसे मिळवली. 

काव्यवाचन स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेत तेजस्विनी तुकाराम ढोणे ही विद्यार्थिनी सहभागी होऊन या विद्यार्थिनीने काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तसेच या विद्यार्थ्यांनी ने वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.यामध्ये समूह गायन या प्रकारात पूजा ढोणे शारदा वैद्य या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता तर वक्तृत्व कला व गायन स्पर्धेत अंबिका चव्हाण तसेच पूजा ढोणे यांनी सहभाग नोंदविला होता.

 यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोदअण्णा एकलारे, सचिव श्री अमृतराजकदम, सहसचिव गोविंदकदम, प्राचार्य डॉ के राजकुमार, उपप्राचार्य डॉ संजय दळवी, श्रीमती शेख फातेमा , पर्यवेक्षक उमाकांत मिटकरी, अनुशाल्व शेजुळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  सांस्कृतिक विभागाच्या डॉ वृशाली आंबटकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शनकेले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या