💥परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी....!


💥सुशिक्षित बेरोजगारांसाठी शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा💥


परभणी (दि.२० फेब्रुवारी) : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून सुशिक्षित बेरोजगारांसाठी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा' येत्या शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. 

या मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदविणार असून, विविध पदांची भरती करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी ०२४५२-२२००७४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या