🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली ; राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ? शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य

* पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना पुन्हा एकदा आव्हान

* निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी, ठाकरे गटांच्या आमदारासाठी व्हीप बजावणार नसल्याचं शिंदे गटाकडून कोर्टात जाहीर

* पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार ; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली

* मोठमोठ्या लोकांचा ओघ शिंदे साहेबांकडे वाढलाय, त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टींचे आंदोलन; उदय सामतांची टीका, तर खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये; राजू शेट्टींचा उदय सामतांवर कडाडून प्रहार 

* एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार 

* अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर, जातीभेदावर बंदी घालणारे Seattle अमेरिकेतील पहिलं शहर, प्रस्ताव आणणाऱ्या क्षमा सावंत यांचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन 

* अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा 

* टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर

* दिल्लीत भाजपचा पराभव, दिल्ली महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांचा विजय, उपमहापौर ही 'आप'चा!

* दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना मोठा धक्का 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाची मंजूरी

* UPSC च्या अर्जात सुधारणा करण्याची संधी, नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2023 साठीच्या अर्जामध्ये चुका असतील तर त्या चूका दुरूस्त करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार मुदत 

 * अहमदनगर: अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा निर्णय; 5 हजार 177 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी 

* Santacruz-Chembur Link Road: मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार, सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार

* साताऱ्यात पोलिसांची धडक कारवाई: तळबीड पोलिसांनी पकडला 84 लाखांचा गुटख्यासह 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

* बारावीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांना अटक: परभणीत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप, शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

* शेअर मार्केटमध्ये घसरण: सेन्सेक्स 927 अंकांच्या घसरणीसह 59,744.98 वर बंद, निफ्टी 272 अंकांच्या घसरणीसह 17,554.30 वर बंद                                          

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या