💥'महिलांनी मासिक पाळी संदर्भात वैयक्तिक जीवनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये' - डॉ.आशा चांडक


💥महिला शिक्षकांसाठी सेलू येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न : एचएआरसी संस्था व गट साधन केंद्राचा उपक्रम💥


परभणी (दि.07 फेब्रुवारी) - होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था व शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांसाठी  'मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य' या विषयावर तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा नूतन महाविद्यालय सभागृह सेलू येथे आयोजित करण्यात आली.  


या 95 व्या कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी प्रा उमेश राऊत यांनी केले 'मासिक पाळी व्यवस्थापन' विषयावर जनजागृती व्हावी म्हणून आयोजित सत्रात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) व डॉ पवन चांडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले मा.गटशिक्षणाधिकारी श्री उमेश राऊत यांच्या प्रयत्नातून महिला शिक्षीकांसाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला जवळपास 140 महिला शिक्षीकांनी उपस्थित राहून उस्फुर्त सहभाग नोंदवला गटशिक्षणाधिकारी श्री उमेश राऊत यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी माहिती देऊन शपथ दिली. 

या प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित महिला शिक्षकांना प्रशिक्षण देतांना विविध टप्यावर माहिती देतांना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.  

        कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ पवन चांडक करतांना म्हणाले "एचएआरसी संस्थे तर्फे 3 जानेवारी 2019 पासून ते आजवर ऐकून 95 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यातील 4 कार्यशाळा खास जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, परभणी व आज सेलू येथे महिला शिक्षकांना उद्बोधन करून प्रशिक्षण दिले आहे. तर परभणी, हिंगोली, वाशीम व बीड जिल्ह्यात आजवर 89 कार्यशाळेत 225 जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील 22 हजार पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींचे समुपदेशन केले आहे. तसेच 13 हजार पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले आहे. हे सर्व उपक्रम कोणतेही मानधन न घेता स्वःखर्चातून व लोकसहभागातून सुरू आहेत. या उपक्रमात आपापल्या परीने सहयोग दिल्यास मासिक पाळी व्यवस्थापन स्त्रियांच्या आयुष्यातील व्यापक आरोग्यपूर्ण चळवळ होईल" कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ काळे मॅडम यांनी केले. 

       या प्रसंगी आयोजक एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन सत्यनारायण चांडक, डॉ आशा चांडक, गटशिक्षणाधिकारी श्री उमेश राऊत,प्रा दयानंद जामगे, केंद्रप्रमुख सय्यद सरदार, गजानन भिते, शरद ठाकर, विजय चिकते, डी डी रोकडे, गिरीश बोरगावकर, सेलू तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होते या कार्यशाळेसाठी एचएआरसी संस्था व  गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधील सुनीता काळे, श्रीमती पद्माकर, श्रीमती आमले  श्री जनार्धन कदम आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या