💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन-२०२३ उत्साहात संपन्न...!


💥वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते विजयराव वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले💥


पुर्णा (दि.१४ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन - २०२३ चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मा.आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) यांंच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात दिपप्रज्वलन करुन मुख्य कार्यक्रम"वार्षिक स्नेहसंमेलन चे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष .विजयराव वरपुडकर  (भाजपा जेष्ठ नेते) ,उद्घाटक गणेशराव कदम (रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ तालुकाध्यक्ष पुर्णा),सौ.सुनिता वानखेडे ( गटविकासाधिकारी पूर्णा),सौ.राधाताई दुधाटे(जिजाऊ ब्रिगेड जिल्हा संघटक),सौ.रेखाताई आवरगंड ( उपसभापती कृ.उ.बा.ताडकळस) याच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणून .मारोती अण्णा मोहिते(गुट्टे काका युवक  मित्रमंडळ पुर्णा,. सुदाम वाघमारे ( रा.स.पा.तालुकाध्यक्ष पूर्णा),श्री.उद्धवराव शिंदे .निवृत्ती दुधाटे रामभाऊ गाडेकर भगवानराव काळे ,सिद्धार्थ मस्के(केंद्रप्रमुख फुलकळस),दयानंद स्वामी(,केंद्रीय मु.अ.फुलकळस) ताडकळस मराठी पत्रकार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून अत्यंत सुंदर कलाकृती सादर केल्या.


मान्यवरांपैकी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव वरपुडकर सुनिता वानखेडे, राधाताई दुधाटे,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये विविध गीते,एकपात्री नाटक व पालखी यासारख्या कलाकृती सादर करण्यात आल्या.हा कार्यक्रम पाहत असतांना  सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील  अनेक गावकरी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती पाहून गावकरी मंडळी हर्षोल्लित झाले या कार्यक्रमामध्ये 10 गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे युवक तालुकाध्यक्ष   mnsमध्ये उत्तीर्ण झालेल्या पाच वीघ्यार्थ्याचा व सुनील शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मारोती अण्णा मोहिते  यांनी शालेय शैक्षणिक साहित्य किट   दिले.कार्यक्रमाचे आयोजन माखणी,शालेय व्यवस्थापन समीती माखणी  जि.प.प्रा.शा.माखणी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे  प्रास्ताविकमु.अ. संजयकुमार जोशी,सुत्रसंचालन गजानन पवार यांनी तर आभार प्रदर्शन अध्यक्ष शिवाजी आवरगंड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी आवरगंड,उपाध्यक्ष बंडू गाडे,सदस्य अनुरथ आवरगंड, संतोष आंबोरे,बापूराव पल्लमपली,गोविंद पल्लमपली,कल्याण आवरगंड,राजेश आवरगंड, बंडु आवरगंड, उद्धव आवरगंड, गोविंद पौळ, काळे,शंकर भुजबळ, नागनाथ नवघरे व  मु.अ.संजय जोशी राजकुमार ढगे ,सुनील शेळके सुरज,पौळ  ,गजानन पवार ,राम महाजन ,ज्योती झटे  रामा आवरगंड आदीनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या