💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एनएमएमएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न...!


💥सदर कार्यक्रमाला पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव बोकारे यांची प्रमुख्याने उपस्थिती💥 


पुर्णा (दि.13 फेब्रुवारी) - तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सोमवार दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी मान्यवर पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत कोमल रंगनाथ बोकारे,स्वरांगी देविदास बोकारे,माऊली रुस्तुम बोकारे व प्रविण दिलीप रणवीर या एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव बोकारे,शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर बोकारे, मा.अध्यक्ष गंगाधर बोकारे, बंडू बोकारे, बाबुराव बोकारे, अंकुश बोकारे, माणिकराव बोकारे, सुधाकर बोकारे,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार,शिक्षक भागवत शिंदे,विलास बोकारे, आबनराव पारवे व श्रीमती योगिता कुलकर्णी हे उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या