💥परभणी जिल्हा पोलिस दलातील ३४ पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या...!



💥जिल्हा पोलिस अधिक्षक आर.रागसूधा यांनी काढले आदेश💥

परभणी (दि.१४ फेब्रुवारी) : परभणी जिल्हा पोलिस दलातील   विविध पोलिस स्थानकांमधील ३४ पोलिस अधिकार्‍यांच्या काल सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

  परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक आर. रागसूधा यांनी दि.१३ फेब्रुवारी रोजी त्यासंबंधीचे आदेश काढले असून बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांची नवा मोंढा पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे परभणी ग्रामीण, पोलिस निरीक्षक सुनिल रेजीतवाढ सोनपेठ, पोलिस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे पाथरी, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे जिंतूर, पोलिस निरीक्षक संतोष सानप पैरवी अधिकारी, पोलिस निरीक्षक संजय करनुर सायबर पोलिस स्टेशन, पोलिस निरीक्षक दिपक दंतूलवार जिल्हा विशेष शाखा, पोलिस निरीक्षक गणपत राहिरे पोलिस यांची कल्याण शाखा येथे बदली करण्यात आले आहे. तर सपोनि कपिल शेळके ताडकळस, सपोनि नरसिंग पोमनाळकर चुडावा, सपोनि कृष्णा घायवट बामणी, सपोनि सरला गाडेकर बोरी, सपोनि सुनील माने  अप्पर पोलिस अधिक्षक परभणी, सपोनि भारत जाधव सीसीटीएनएस पोलिस अधिक्षक कार्यालय, सपोनि बालाजी पुंड नानलपेठ, सपोनि वसंत मुळे नानलपेठ, सपोनि मुख्तार सय्यद जिंतूर, सपोनि दिनेश सूर्यवंशी पालम, सपोनि वामन बेले नवा मोंढा, सपोनि श्रीनिवास भिकाणे पाथरी, सपोनि अनिल कुरुंदकर परभणी ग्रामीण, सपोनि शिवाजी देवकते गंगाखेड, सपोनि शिवप्रकाश मुळे भरोसा सेल, सपोनि गुलाब बाचेवाड कोतवाली, सपोनि संदिप बोरकर एटीसी, बीडीडीएस, सपोनि विजय रामोड यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच पोउपनि राम जगाडे यांची नवा मोंढा, पोउपनि माधव इजाळकर यांची नानलपेठ, पोउपनि श्रीधर तरडे ताडकळस, पोउपनि चाँद सय्यद उपविभागीय पोलिस अधिकारी गंगाखेड, पोउपनि माधव लोकूरवार वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी परभणी ग्रामीण, पोउपनि मारोती फड चुडावा, पोउपनि प्रकाश पंडीत यांची दामिनी पथक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या