💥जिंतूर येथे इंटिग्रेटेड योग,प्राणायाम व ध्यान शिबिराची दीप प्रज्वलनाने सुरुवात....!



💥ज्येष्ठ नागरिक ॲड.हरिहरराव देशमुख व ॲड.नागोरावजी जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबीरास सुरुवात💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथे आज 02 फेब्रु.रोजी सकाळी 5:30 वाजता येथील ज्येष्ठ नागरिक तथा ॲड.हरिहरराव देशमुख व ॲड.नागोरावजी जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने  सुरुवात करण्यात आली.

आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जिंतूर येथे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात सकाळी 5:30  ते 7:30 या वेळेत इंटिग्रेटेड योग प्राणायाम व ध्यान शिबिरांचे सुरुवात दीप प्रज्वलनाने होऊन याप्रसंगी जिंतूर येथील ज्येष्ठ नागरिक व ॲड.हरिहरराव देशमुख,ॲड.नागोरावजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत  वसंतराव देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीरामजी शेप यांनी केले.याप्रसंगी योग साधक, योगशिक्षक व अनेक योग प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व योग साधकांना व्यासपीठावरून श्री धोंडीरामजी शेप जिल्हाध्यक्ष भारत स्वाभिमान न्यास परभणी, कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख,सौ मोहिनी दराडे शहर महिला प्रभारी व सौ.प्रतिभा साबळे  महिला तालुका प्रभारी पतंजली योग समिती यांनी उपस्थित तांना योग प्राणायाम चे उत्कृष्ट धडे दिले व योगा बद्दलची माहिती सांगितली.

हे शिबिर 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणार असून शिबिराची वेळ 5:30 ते 7:30 अशी असणार असून या शिबिरांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आव्हान भारत स्वाभिमान्यास पतंजली योग समिती, किसान सेवा समिती, महीला पतंजली समिती, युवाभारत समिती, अदी पदाधिकाऱ्यांनी आव्हाण केले आहे.

या शिबिरासाठी धोंडीरामजी शेख सर, वसंतराव देशमुख, यादवराव साखरे, उद्धव सूर्यवंशी, गुलाब साबळे, पुरुषोत्तम अंभोरे, प्रा. डॉ. अशोक वैद्य सखाराम निलंगे,सौ. सुहासिनी जाधव, सौ प्रतिभा साबळे, लखुजी जाधव, श्रीराम कडे ,बि.डी.रामपूरकर (योगशिक्षक)सचिन रायपत्रीवार, सौ मोहिनी दराडे, आदींनी करण्यासाठी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या