💥पुर्णेत वराह चोरी प्रकरणात अकोला येथील दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल....!


💥या प्रकरणात आयशर ट्रक व एक लाख रुपये किंमतीचे दहा वराह जप्त💥


पुर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - पुर्णा शहरासह तालुक्यात गाढव वराहांसह अन्य जनावरांच्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असून असाच एक चोरीचा प्रकार दि.०२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास पुर्णा शहरातील एकलारे पेट्रोल पंपामागील परिसरात घडला येथील वराह पालक मनोज आनंदसिंग सौदा रा.व्यंकटी प्लॉट पुर्णा यांच्या मालकीच्या एकलारे पेट्रोल पंपा मागील वराह कोंडवाड्यातील तब्बल १० वराह त्यांचा मुलगा राहूल मनोज सौदा घरी जेवन करुन येऊस्तर या ठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आयशर टेम्पोत भरुन पळवली राहुल सौदा या वराह कोंडवाड्याकडे मोटार सायकलवरुन आल्यानंतर त्यांना टेम्पो जातांना दिसला यावेळी सदरील टेम्पोचा त्यांनी पाठलागही केला परंतु संबंधित टेम्पो चालकाने आयशर टेम्पो सुसाट वेगाने पळवला यावेळी आयशर टेम्पोचा क्रमांक एम.एच ०४ जिसी ४२३३ राहुल सौदा यांनी लिहून तब्बल दोन दिवस शौधाशोध केल्यानंतर दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांना वसमत येथील त्यांच्या पाहुण्यांकडून समजले की एक आयशर टेम्पो वराह भरुन परभणीकडे जात आहे.

या वराह चोरी प्रकरातील आयशर टेम्पोचा मागोवा घेत मनोज सौदा त्यांच्या परिवारातील त्यांचे नातेवाईक वसमत-परभणी मार्गावरील झिरोफाटा येथे गेले असतांना त्यांना वराह भरलेला आयशर टेम्पो क्रमांक एम.एच ०४ जिसी ४२३३ हा झिरोफाटा येथे उभा असलेला आढळून आला यात डोकावून पाहिले असता त्यांना त्यांचे मालकीचे कान कापलेले चोरीस गेलेले दहा वराह दिसले यावेळी त्यांनी चालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव बाबाराव रामदास वानखेडे असल्याचे व सदरील आयशर गाडी अकोला येथील रहिवासी बच्चन यांनी किरायाने केल्याचे सांगितले यावेळी मनोज सौदा यांनी तात्काळ पुर्णा पोलिस स्थानकात फोन करून पोलिसांना घटनास्थळावर बोलावून गाडीसह चालक बाबाराव वानखेडे व बच्चन यांना ताब्यात घेतले या प्रकरणी मनोज आनंदसिंग सौदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी चालक बाबाराव वानखेडे व बच्चन यांच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात कलम ३७९ सह ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या