💥परभणीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने लेझीम स्पर्धा संपन्न....!

 


💥यावेळी विशेष अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती💥


परभणी (दि.१७ फेब्रुवारी) - परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक राग सुद्धा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी विशेष अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, आय एम ए चे जिल्हाध्यक्ष डॉ राजगोपाल कालानी ,क्रीडा भारतीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव शेलगावकर, कार्याध्यक्ष अनंतराव देशमुख, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त डॉ माधव शेजुळ ,क्रीडा अधिकारी संजय मुंडे,  कृष्णा कवडी सर हे उपस्थित होते त्याचबरोबर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे सुभाषराव जावळे रामेश्वर शिंदे ,व्यंकटराव शिंदे, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, एडवोकेट जी .आर .देशमुख एडवोकेट पवन निकम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या लेझीम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील चारठाणा, पूर्णा तसेच परभणी शहरातील अनेक शाळेचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेमध्ये  सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे पंच म्हणून एस. के. स्वामी हे होते तर प्रास्ताविक रणजीत काकडे यांनी तर सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या