💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!

                       


    

💥अयोध्येत आले १४० दशलक्ष वर्ष जुने शाळीग्राम💥

✍️मोहन चौकेकर

* आशिया खंडातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना कर्नाटकमधील तुमाकुरु येथे तयार, 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सुपूर्द करणार, 20 वर्षात 1000 हून अधिक हेलिकॉप्टर तयार होणार.

* उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म दिले; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप 

* मी काँग्रेसमध्येच, मात्र आमदार म्हणून अपक्षच राहणार... सत्यजीत तांबेंची स्पष्ट भूमिका तर  शुभांगी पाटलांनी बांधलं शिवबंधन; म्हणाल्या, आता खरी लढाई सुरू झाली. 

* मी राजीनामा देतो तुम्हीही राजीनामा देऊन वरळीत माझ्या विरोधात निवडणूक लढा ; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज.

* पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार ठरले; कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी. 

* महाराष्ट्राचं राजकारण अन् निवडणुका दारूच्या पैशांवर अवलंबून; वर्धा साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत पद्मश्री डॉ. अभय बंग यांची टीका 

* श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, व्हिडिओ होतोय व्हायरल.

* मुंबईकरांच्या आरोग्यासाठी बीएमसी सरसावली! अर्थसंकल्पात 'हेल्थ'साठी 6309 कोटींची खास तरतूद.

* थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या; परभणीचा पारा 8 अंशावर, विदर्भातही थंडीचा जोर वाढला, नागपूरचा पारा 9.6 अंशांवर  

* मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर; मुंबईचे बजेट 8 लहान राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त; 52,000 कोटी रुपयांचे बजेट.

* अदानी ग्रुपच नाही तर 36 कंपन्यांमध्ये LIC ची गुंतवणूक; 6 महिन्यांत एलआयसीच्या​​​​​​​ मूल्यात 58% घसरण.

* पिंपरी येथे सोने तारण घेऊन कर्ज देणाऱ्या कंपनीला तिघांनी फसवल्याचा प्रकार; 27 लाख 80 हजार 100 रुपयांची फसवणूक. 

* गुजरातच्या अहमदाबाद येथील कर्मचाऱ्यांना मिळणार भेट म्हणून कार, त्रिध्या टेक लिमिटेड कंपनीच्या स्थापनेपासून जे कर्मचारी कंपनीशी संबंधित आहेत त्यांना मोठं गिफ्ट

* इम्फाळमधील हट्टा कांगजेबुंग भागात आज एका फॅशन शोच्या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट, अभिनेत्री सनी लिओनीच्या शोस्टॉपर इव्हेंटच्या एक दिवस आधी स्फोट. 

* आनंद महिंद्रांनी जागतिक मीडियाला दिली चेतावणी, म्हणाले, "मी एवढेच सांगेल, भारताच्या नादी कधी लागू नका"

* नाशिक-पुणे महामार्गावरील एका महाविद्यालयाच्या समोर तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, लाथा बुक्क्यांनी झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल.

* बिग बॉस फेम सपना चौधरी विरोधात FIR, मुलगी जन्माला आल्याने क्रेटा कारसाठी छळ; भावाच्या पत्नीने केले गंभीर आरोप.

*कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर; धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती.

* 2023-24 च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा कायापालट करण्यासाठी महाराष्ट्रासाठी 13,539 कोटी रुपयांचा निधी; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

* खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पाचव्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर; 14 गोल्ड, 17 सिल्व्हर पदकासह मिळवले 43 पदक.

* पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही : शैलेश टिळक म्हणतात समाजात अन्यायाची भावना.

* मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी दीड हजार कोटींची तरतूद, स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत सात योजनांची घोषणा.

* अदानी एंटरप्रायझेस प्रकरणाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम नाही, नियामक संस्था त्यांचे काम करत आहेत; निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण.

* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार; टीम इंडियाने जोरदार तयारी सुरू करत सरावासाठी 8 स्पिनर्सची फौज केली तयार.

* एफपीओ येतात व बाहेर जातात, चढ-उतार सर्वच बाजारांत! पण मागील काही दिवसांत आपल्याकडे 8 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी आली ही वस्तुस्थिती - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

* गूगल लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये AI फीचर जोडणार, यूझर्स लवकरच इंटरनेट सर्चमध्ये लेटेस्ट लँग्वेज मॉडेलसह थेट संवाद साधू शकणार.

* प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम काळाच्या पडद्याआड: वयाच्या 78 व्या वर्षी निधन, करिअरमध्ये गायली 10 हजारांहून अधिक गाणी.

* अमेरिकेत आर्क्टिक ब्लास्ट: न्यू हॅम्पशायरच्या माउंट वॉशिंग्टनमध्ये तापमान -79 डिग्री सेल्सिअसपर्यंत, शाळांना सुट्टी, मेन राज्यात 150 शेल्टर सुरू.                                               

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या