💥मंगरुळपीर तालुक्यातील किन्हीराजा येथे अवैध जुगार खेळणाऱ्यांवर धाड ; १६ आरोपींसह ०५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात....!


💥वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.


     त्या अनुषंगाने दि.२०.०२.२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मंगरूळपीर व पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगार खेळत असतांना पो.स्टे.जऊळका हद्दीतील ग्राम किन्हीराजा येथे धाड टाकून १६ आरोपींसह ५,१३,७३०/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा चार्ज मंगरूळपीर श्री.जगदीश पांडे यांना गुप्त बातमीदारांमार्फतमिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम राजाकिन्ही येथे पंचांसह जावून काही इसम प्रतिबंधित वरली मटक्याच्या पैश्यांचा हारजीतवर जुगार खेळतांना दिसले वरून त्यांच्यावर धाड टाकत १६ आरोपींकडून नगदी ३९,६३०/- रुपये, १४ मोबाईल फोन अं.किं.१,०९,१००/-रु. व ८ मोटार सायकली अं.किं.३,६५,०००/-रु. असा एकूण ५,१३,७३०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर पो.स्टे.जऊळका येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वयेगुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे सोबत पोलिस टिम यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावीत्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या