💥परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वस्तीगृहात विज्ञानातील महिला व मुली आंतरराष्ट्रीय दिन साजरा...!


💥याप्रसंगी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये  विज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासाकडे कसे जाऊ शकतो यावरही मत व्यक्त केले💥

परभणी (दि.१४ फेब्रुवारी) -  प्रतीवर्षी 11 फेब्रुवारी हा विज्ञानातील महिला व मुली आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो . या दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सावित्रीबाई फुले मुलींचे  वस्तीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींनी विज्ञानात आपली ओळख निर्माण केलेल्या अनेक महिलांचा व संशोधकांचा त्यांच्या भाषणातून परिचय करून दिला तसेच याप्रसंगी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये  विज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासाकडे कसे जाऊ शकतो यावरही मत व्यक्त केले.


भारतामध्ये 43% एवढे महिला व मुली विज्ञानामध्ये संशोधन करून देशाच्या विकास कार्यात मोलाचे योगदान देत आहेत.कृषिप्रधान देशात अनेक महिला शास्त्रज्ञ विविधतापूर्ण संशोधन करुन अन्नधान्य सुरक्षा व शाश्वत विकासात्मक कार्यासाठी अग्रेसर आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद येथील महासंचालक यांचा  या दिनानिमित्त प्रसारित झालेला संदेश उपस्थितांमध्ये देण्यात आला या संदेशात असे सांगण्यात आले की  स्त्रियांना विज्ञानाची गरज आहे आणि विज्ञानाला स्त्रियांची गरज आहे.  केवळ ज्ञानाच्या सर्व स्रोतांचा, प्रतिभेच्या सर्व स्रोतांचा वापर करून, आपण विज्ञानाची पूर्ण क्षमता उघडू शकतो आणि आपल्या काळातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. याप्रसंगी कु. अनुराधा ,दुर्गा ,सिध्दी व समृद्धी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले. कृषी महाविद्यालय परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.सय्यद इस्माईल  व वस्तीगृह अधीक्षक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. गोदावरी पवार सहयोगी प्राध्यापक तथा सहाय्यक वस्तीगृह अधीक्षक व सुनिता भुरके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. प्रसंगी सावित्रीबाई फुले वसतीगृहातील सर्व विद्यार्थिनी उपस्थितीत होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या