💥वाशिम जिल्ह्यातल्या किन्ही राजा येथील अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपींना ०५ दिवसांची पोलीस कोठडी...!


💥मृतकाची पत्नी नामे लीलाबाई विश्वास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन दाखल करण्यात आला होता गुन्हा💥


(फुलचंद भगत)

वाशिम:-दि.१८.०२.२०२३ रोजी प्रभारी अधिकारी पो.स्टे.जऊळका यांना १६.०० वा दरम्यान फोन वरून माहिती मिळाली कि, किन्ही राजा येथून विश्वास कांबळे, रा.बोराळा यांचे अपहरण केले असून त्याला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन इसमांनी टाकून पळवून नेले आहे. सदर माहिती ठाणेदार जऊळका यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा चार्ज मंगरूळपीर यांना दिली वरून उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.स्टे.प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी किन्ही राजा येथे पोहोचून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस पाटील गुंज यांनी माहिती दिली कि, बोराळा येथील विश्वास कांबळे गुंज फाट्यावर गोडावून समोरील फाट्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला आहे. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.स्टे.प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफसह गुंज फाट्यावर जाऊन अपहरण झालेला इसम विश्वास बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला पोलीस वाहनातून उपचाराकरिता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषीत केले.

          मृतकाची पत्नी नामे लीलाबाई विश्वास कांबळे, वय ५५ वर्षे, रा.बोराळा, ता.मालेगाव, जि.वाशिम यांनी दि.१९.०२.२०२३ रोजी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून आरोपी नामे क्र. १) केशव नरहरी वानखेडे, २) रामचंद्र नरहरी वानखेडे, ३) शामसुंदर नरहरी वानखेडे, ४) नामदेव नरहरी वानखेडे सर्व रा.बोराळा, ता.मालेगाव, जि.वाशिम यांचे विरुद्ध पो.स्टे.जऊळका येथे अप.क्र.४१/२३, कलम ३०२, ३६४, १२० ब भादंवि सहकलम ३ (२)(va), ३ (२)(v) अजाजअप्रका अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपींना अटक करून वि.न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२३.०२.२०२३ पावेतो ०५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी नामे गुणवंत लक्ष्मण महाले, वय २४ वर्षे, रा.जांभरून महाली याचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दि.१९.०२.२०२३ रोजी अटक करून वि.न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रकारणात आजपावेतो एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरु आहे.

          सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा चार्ज मंगरूळपीर हे करत आहेत......  


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या