🌟दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून डॉ.शंकररावजी चव्हाण विष्णुपुरीत प्रकल्पात सोडले पाणी....!


🌟दिग्रस बंधाऱ्याच्या चौदा गेटां पैकी आठ गेटातून सोडण्यात आले पाणी🌟

परभणी/पालम - दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०६-०० वाजता डॉ.शंकररावजी चव्हाण विष्णुपुरीत प्रकल्पात पाणी सोडण्यात आले. 


दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून डॉ शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात ३२.२७ दलघमी पाणी सोडण्यात आले. सध्या दिग्रस बंधाऱ्यात १८.४७ दलघमी पाणी शिल्लक आहे. याकरिता विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता अरुण अंकुलवार, यांत्रिकीचे उपअभियंता श्री पिसोटे, विद्युत विभागाचे उप अभियंता श्री सुभेदार  पालम तहसीलदार श्रीमती गोरे मॅडम पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप काकडे तसेच पाटबंधारे महसूल व  पोलीस खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. धानोरा काळे येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यावर ह्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक राहणार असल्याची माहिती विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता अरुण अंकुलवार यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या