💥पुर्णा येथील श्री.गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहानं साजरी....!


💥यावेळी डॉ.बालासाहेब मुसळे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली💥

पूर्णा (दि.०५ फेब्रुवारी) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात संत श्री रविदास महाराज यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांच्या हस्ते श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. डॉ बालासाहेब मुसळे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.


प्राचार्य डॉ के. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री दत्ता जाधव, कालिदास वैद्य , गणेश सोळंके, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या