💥परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले अभिवादन....!


💥परभणी शहरासह जिल्ह्यातील शिवभक्तांना दिल्या 'शिवजन्मोत्सवाच्या' हार्दिक शुभेच्छा💥

परभणी (दि.१९ फेब्रुवारी) - शहरातील जिल्ह्यात आज रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक आर.रागसुधा,महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह परभणी मनपातील तसेच पोलिस दलासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या