💥मंगरुळपीर येथे शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यासाठी आक्रमक......!


💥शासनाचे लक्ष वेधन्यासाठी कर्मचाऱ्यांनी केले लाक्षनिक ऊपोषण💥


(फुलचंद भगत)

वाशिम:-मागील अनेक वर्षापासुन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. त्यामुळे प्रलंबीत असलेल्या मागण्यांची पुर्तता होईपर्यंत २ फेब्रुवारी पासुन सुरु असलेले महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ तसेच महासंघ कृती समिती महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटणांचे राज्यव्यापी आंदोलन हे शासन परिपत्रक मिळेपर्यंत सुरुच राहणार आहे असा आक्रमक पविञा घेत शासनाचे लक्ष वेधन्यासाठी लाक्षनिक संपाचे हत्यार कर्मचार्‍यांनी ऊचलले आहे मंगरुळपीर येथील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विविध मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला परंतु दखल न घेतल्यामुळे शेवटी संपाचे हत्यार ऊचलन्याचा निर्णय कर्मचार्‍यांनी घेतलाकालबध्द पदोन्नती व आश्वाशीत प्रगती योजना, तसेच जुनी पेन्शेन योजना, सातवा वेतन आयोग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोजाचे हप्ते, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती, या विविध प्रलंबीत मागण्या आहेत. आश्वाशीत प्रगीती योगजनेचा २०१७ आणी २०१८ मध्ये योजना रदद केलेला जी.आर. पुर्णजिवीत करण्यात यावा व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुरु असलेली आश्वाशीत प्रगती योजना लागु करुन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रमक झाले.


आश्वाशीत प्रगती योजना ही सुरुवातीपासुन चालु आहे आणि ती नियमित करुन दयावी हेच आमचे शासन दरबारी मागणे आहे.असे कर्मचार्‍यांनी सांगीतले.सदर मागणी ही नियमाला धरुन असल्यामुळे प्राचार्य फोरम, नागपुर विद्यापीठ, टिचर असोशीएशन अमरावती विभागीय शिक्षक संघ, महाराष्ट्र विद्यापीठ अन्ड कालेज लायब्ररी असोशिएशन,व महाराष्ट्र राज्य शासकिय निमशासकीय लिपीकवर्गीय हक्क परिषद, विविध संघटना तसेच विधान संघटनांणी पाठींबा दर्शविला आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्याची पर्तता न केल्यास हे आंदोलन सुरुच राहणार अशी भुमिका घेण्यात आली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या