🌟मुंबई येथे तांत्रिक अप्रेन्टिस,कंत्राटी कामगार असोसिएशनचे आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन....!


🌟मुंबईत दि.१६ मार्च रोजी आयोजित धरणे आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे🌟

मुंबई:-महावितरण,महापारेशन,महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व तिन्ही कंपनीचे प्रशासन उदासीन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता आझाद मैदान मुंबई येथे दि.१६ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  तांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात दिली आहे.

 कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, याकरीता विशेष भरती मोहीम राबवावी, कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी. शिकाऊ उमेदवारांना तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये  १०० टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीवर घेण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये वयोमर्यादावाढवावी.कत्रांटदार मासिक वेतनामधुन ४०००ते ६०००रुपयाची मागणी केली जाते.   आदी प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करूनही दखल घेत नसल्याने तसेच राज्याचे ऊर्जामंत्री महोदयांनी 4 जानेवारी 2023 रोजी कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती मध्ये प्राधान्य व शाश्वत रोजगाराची  हमी बाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते परंतु शासन व प्रशासन स्तरावर केलेल्या घोषणेबाबत उदास उदासीनता दिसत असल्याने कंत्राटी कामगारांमध्ये  प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण झाला असल्याने महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात  मुंबई येथे दि.१६ मार्च २०२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रिय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर.पवार,गोपाल गाडगे,सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उप सरचिटणीस नितिन भैय्या चव्हाण, शिवाजी शिवणेचारी,संजय उगले,राज्य सचिव आनंद जगताप,रघुनाथ लाड,  संघटक महेश हिवराळे, कोषाध्यक्ष गजानन अघम, संजय पाडेकर, विक्रम चव्हाण, तांत्रिक टाईम संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, संस्थापक अध्यक्ष किरण कहाळे, सरचिटणीस प्रकाश वाघ यांचा मागदर्शनाखाली करण्यात येणार आहे.या  आंदोलनामध्ये कंत्राटी कामगारांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे,उपाध्यक्ष अनिल चव्हाण,सरचिटणीस राहिल शेख, उप सरचिटणीस प्रताप खंडारे, कोषाध्यक्ष अतुल थेर, उपाध्यक्ष दत्तात्रय धायगुडे, अनिवेश देशमुख,कुणाल जिचकार,मयुर कोठे, दिनेश काळे,विक्की पाचघरे, श्याम भारती, विकास ठुसे,स्वप्निल सोनसकर,गगन सहारे, स्वप्निल ईटणकर,गौरव वानखेडे, विजय सोनी, राजू गायकवाड, शाम भारती,गजानन खंदारे, सदाशिव भुसारी यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या