💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील शिंगणापूर-पूर्णा हा रस्ता 'वाहनाच्या रहदारीचा रस्ता की वाहनतळ'.....!

 


[ताडकळस येथील सिंगणापूर रोडवर बांधकाम मशीनसह उभी असलेली वाहन त्यातून मार्ग काढते वेळेस विद्यार्थी]

💥वाहनाच्या अडथळ्या मुळे गैरसोयीचा प्रवास होत असल्याचे नित्याचेच💥

पुर्णा (दि.०६ फेब्रुवारी) - तालुक्यातील ताडकळस येथील मुख्य बाजारपेठ त्या मधोमध गेलेला महामार्ग शिंगणापूर ते पूर्णा सध्या ऊस तोडणीस आलेली कामगार क्लासेस जाणारी विद्यार्थी लग्नसराईची खरेदी साठी झालेली महिलांची गर्दी आदी बाबीसाठी येणाऱ्या नागरिकांना व शाळेतील पादचारी विद्यार्थ्यांना दोन्ही बाजूने उभे लावलेले रस्त्यातील नादुरुस्त मशीन व वाहने असल्याने त्यातूनच जीव मुठीत धरून आपले दैनंदिन कार्य दररोजच्या जीवनशैलीत प्रवास करण्यासाठी वाहनाच्या अडथळ्या मुळे गैरसोयीचा प्रवास होत असल्याचे नित्याचेच होत चाललेले आहे

[ताडकळस पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेलेल्या महिला व मुलगी आधी दिसत आहेत]

ताडकळस मुख्य बाजारपेठ त्यात रविवारचा बाजार कृषी उत्पन्न कार्यालय भारतीय स्टेट बँक जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक या ठिकाणी  कार्य करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रोडवर ये जा करणाऱ्या वाहनाची मोठी वर्दळ असते त्यातच वाहन तळ्यासारखे उभी असलेली वाहण्याची संख्या मोठीच दिसून येत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतच आहे या होणाऱ्या वाहनाच्या अडथळ्यास प्रशासनाने व पोलीस यांनी पादचारी रस्ता मोकळा करून द्यावा अशी ग्रामस्थांत मागणी होत आहे.

पोलिसांचा अन्नभिद कारभारामुळे शुक्रवार ता. ३ रोजी पादचारी महिलेस व मुलीस जोराची धडक देऊन दूचाकी वाहनाने झालेला अपघात त्या ठिकाणी कर्तव्यवर असलेली पोलीस कर्मचारी बघ्याचीच भूमिका घेत होते त्या महिलेने पोलीस ठाणे गाठूनही तक्रार घेण्याऐवजी त्यास महिलेस पोलीस स्टेशनच्या समोर वेदना सहन करीतच बसवले पुढाऱ्याच्या मदतीने तडजोडीचेच प्रकरण करावे लागले अशा घटना वरिष्ठ अधिकाऱ्याने रोखून अपघातग्रस्त नागरिकांना न्याय द्यावा अशी विनंती त्या महिलेने केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या