💥वैज्ञानिक जाणीव जागृती काळाची गरज - इंजि.सम्राट हाटकर


💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात आयोजित वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रमात ते बोलत होते💥


पूर्णा (दि.०९ फेब्रुवारी) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात भानामती व जादूटोणा निर्मूलन विभागाच्या वतीने आयोजित वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंजिनीयर सम्राट हटकर यांनी वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना सहभागी करत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर  देत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ संजय दळवी, तसेच उपप्राचार्य प्रा शेख फातिमा यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजात असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांचे होणारे शोषण थांबले पाहिजे हा विचार समाजात दूरवर पोहोचावा हा उद्देश या कार्यक्रमा मागे होता. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ के राजकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवसांब कापसे केले तर आभार बी बी मुसळे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी डॉ प्रकाश भांगे, डॉ जी पी कापुरे ,डॉ शेख राजू, डॉ संतोष चांडोळे  यांनी परिश्रम घेतले. वरीष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सदरील कार्यक्रमास उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या