💥पुर्णा तालुक्यातील मौ.कानडखेड येथे माता रमाई जयंती निमित्त दि.०८ फेब्रुवारी रोजी भिम व बुध्द गितांचे आयोजन...!


💥माता रमाई जयंती महोत्सवास मुख्य मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत उपगुप्त महास्थवीर व पुज्य भदंत पय्यावंश यांची उपस्थिती💥 


पुर्णा (दि.०४ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील मौ.कानडखेड येथील बौध्द विहार येथे बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास त्यागमुर्ती माता रमाई जयंती निमित्त भिम व बुध्द गितांचे आयोजन करण्यात असून या भिम व बुध्द गितांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश रंजवे सोनपेठ,प्रसिध्द गायिका प्रीती भालेराव परभणी,प्रसिध्द गायक प्रशांत पाईकराव परभणी यांच्यासह पुर्णा तालुक्यातील प्रसिध्द गायक 'कोहिनुर हिरा' प्रकाश जोंधळे आदींच्या भिम व बुध्द गितांचा रंगारंग कार्यक्रम होणार असून त्यागमुर्ती माता रमाई जयंती महोत्यवास मुख्य मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत उपगुप्त महास्थवीर व पुज्य भदंत पय्यावंश यांची आवर्जून उपस्थिती राहणार आहे.

तालुक्यातील मौ.कानडखेड येथे त्यागमुर्ती माता रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन सम्राट प्रतिष्ठान कानखेड यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौ.कानडखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुमनबाई मारोतराव बखाल तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास पुर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,पै.मारोतराव बनसोडे,पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तम खंदारे,मानुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.अनिल कांबळे,अमजद नुरी,ॲड.संदिप पठारे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम,राजे मल्हार मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ होळकर,अधिराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कांबळे,सामाजिक कार्यकर्ते इरशाद खान पठाण उर्फ इश्यू पठाण,पोलिस पाटील सौ.कविताबाई काळे,मिलिंद कांबळे,सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी गायकवाड,प्रवीण गायकवाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या