💥केजमध्ये पत्रकार अभिमन्यू फड यांना मारहाण दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.......!


💥या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत💥

✍️ मोहन   चौकेकर 

केज :- सुदर्शन न्युज चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू फड यांना केज बस  स्थानकात दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

याबाबत केज पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, पत्रकार अभिमन्यू फड हे औरंगाबाद- अंबाजोगाई या बस मध्ये प्रवास करीत असताना आरोपी डॉ. मोसिन शेख व अनोळखी काळ्या शर्टचा इसमाने  तु सुदर्शन न्युज का है  क्या? असे म्हणुन कॉलर धरुन खाली औढुन मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी, चापाटाने मारुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान झालेल्या झटापटीत हातातील घड्याळ तुटले आहे. तसेच खिशातील 14 हजार पाचशे रुपये पडले आहेत. या प्रकरणी पत्रकार अभिमन्यू फड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सदरील दोन आरोपी विरुद्ध गु.र.नं. 70/2023 कलम 323, 504, 506, 427, 34 भादवी सह कलम 4 महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणी प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य) मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतीबंधक अधीनीयम 2017 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या