💥जिंतूर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन : आज शोभा यात्रेने भव्य प्रारंभ...!


💥कथेची सांगता 13 फेब्रुवारी रोजी होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर शहरातील चैतन्योदय गुरुकुल आश्रम या ठिकाणी आचार्य महेश महाराज जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगीराज संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त प्रथमच श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा वाचक परमपूज्य भागीरथ जी महाराज सारस्वत सेलू आहेत तसेच दररोज सकाळी 9 ते 11 गजानन विजय ग्रंथ पारायण शिवमहापुराण कथा दुपारी एक ते पाच आणि दररोज रात्री आठ वाजता हरी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 या निमित्त आज पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा काढून कथेला प्रारंभ झाला आहे कथेची सांगता 13 फेब्रुवारी रोजी होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संत श्री गजानन महाराज मित्र मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे दररोज रात्री सुप्रसिद्ध कीर्तनकार सर्व ह भ प नारायण महाराजपांगरीकर विनायक महाराज जिंतूरकर भीमराव महाराज भिलजकर रमेश महाराज जोगवाडकर प्रेमसिंग महाराज नायगावकर भारत महाराज पांचाळ अच्युत महाराज दस्तापुरकर तर काल्याचे किर्तन माऊली महाराज मुडेकर यांचे होणार आहे यजमान सौ. जयाताई यादवराव थिटे असून यानिमित्त भाविकांनी श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महेश महाराज जिंतूरकर यांनी केले आहे यानिमित्त शहरात भक्ती भाव मय वातावरण निर्माण झाले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या