💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन.....!


💥जिल्हा माहिती कार्यालयातही दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना करण्यात आले अभिवादन💥

परभणी (दि.२० फेब्रुवारी) : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे, उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, सुधीर पाटील, नायब तहसीलदार नानासाहेब भेंडेकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 


* जिल्हा माहिती कार्यालय :-

दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘कृपावंत’चे संपादक आश्रोबा केदारे, घटनेचा शिल्पकारचे संपादक भूषण मोरे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या