🌟गंगाखेड तालुक्यातील मौ.जवळा रूमणा येथे बाल कला महोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न....!


🌟जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बालकला महोत्सवाचे आयोजन🌟

गंगाखेड (दि.२८ फेब्रुवारी) - गंगाखेड तालुक्यातील मौ.जवळा रूमणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बालकला महोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री जगन्नाथ चंद्रभान कदम  चेअरमन, तथा सरपंच हे होते. तसेच  उद्घाटक म्हणून मा. डॉ. सुभाष कदम भाजपा जिल्हाध्यक्ष  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल प्रसाद पवार सर केंद्रप्रमुख खळी, श्री तुषार भैय्या गोळेगावकर, बळीराजा शिक्षण संस्था इसाद, श्री कृष्णा  नामदेवराव सोळंके रा.स. प. गंगाखेड विधानसभा अध्यक्ष, श्री कृष्णा  टीकाराम सोळंके भाजपा तालुका अध्यक्ष गंगाखेड, हे होते. तर गावातील प्रमुख उपस्थिती म्हणून श्री मंचकराव बापूराव कदम, श्री कोंडीबा माणिकराव कदम तंटामुक्ती अध्यक्ष जवळा   सौ जनाबाई जगन्नाथ कदम  सरपंच, सौ.   सुवर्णाताई अनिल कदम, उपसरपंच सौ.अनिता इंद्रजीत गायकवाड पो.पा  जवळा, यांची होती तर स्वागत अध्यक्ष म्हणून  राम गायकवाड  हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री  ज्ञानोबा कदम यांनी केले तर सूत्रसंचालन अंकुश कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शिवाजी भडके, मुख्याध्यापक जवळा, कमलोद्दिन काजी सर,जयश्री मामडगी मॅडम, फारूक पाशा सर, बली साबळे श्री शिवाजी टेंगुळे, शालेय समिती अध्यक्ष, शेख युसुब शालेय समिती उपाध्यक्ष यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या