💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'शिव जन्मोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच निमाजी गाडे तर प्रमुख पाहुणे शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी आवरगंड हे होते💥


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'शिव जन्मोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.                                      

तालुक्यातील माखणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने शिव जन्मोत्सव अतिशय आनंदात साजरा करण्यात आला माखणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला व तसेच मारुती मंदिरावर ग्रामस्थांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला माखणी येथे शिवरायांचा तीन ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाजी गाडे माजी सरपंच हे होते प्रमुख पाहुणे शाळा शालेय व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष शिवाजी आवरगंड उपाध्यक्ष बंडू गाडी प्रतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड संजय आवरगंड रोजगार सेवक यशंवत गाडे नामदेव पलमपल्ली हे होते शिवरायांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थिनींनी कुमारी ते दिव्या आ. श्रद्धा आ मयुरी आ शिवानी भुजबळ मिलिंद गाडे तेजस्विनी आ मनस्वी महाजन हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीला स्त्री आत्मसन्मानाने कशी जगत होती या विषयावर प्रकाश टाकला तेजस्विनी आवरगंड हिने शिवरायांच्या कलागुणाचे वर्णन केले राजेश गाडे प्रगतिशील शेतकरी तथा पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी शिवरायांच्या  इतिहास  सांगण्याचा प्रयत्न केला व राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत तेरखेडा जिल्हा उस्मानाबाद येथे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल कुमारी तेजस्विनी आवरगंड मान्यवराच्या  वतीने सत्कार करण्यात आला व शिवरायाच्या जीवन चरित्रावर भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थिती समितीचे सदस्य शिवाजी आवरगंड बंडू गाडे अनुरथ आवरगंड संतोष आंबोरे सुग्रीव भुजबळ गोविंद पलमपल्ली कल्याण आवरगंड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदींनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या