💥महापुरुषांच्या चरित्र वाचनाने आपले आयुष्य समृद्ध होऊ शकते विद्यार्थ्यांनी सुसंगती धरावी - अप्पासाहेब खोत


💥येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात ज्ञानोत्सव 2023 स्नेह संमेलना प्रसंगी ते बोलत होते💥

परभणी (दि.01 फेब्रुवारी) - येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात ज्ञानोत्सव 2023 स्नेह संमेलनाची काल सांगता झाली. ग्रामीण विनोदी कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या खुमासदार कथेने (गॅदरिंग चा पाहुणा) या कथा कथनाने श्रोत्यात हशा पिकला या वेळी अध्यक्ष स्थानी ऍड. गणेशराव दुधागांवकर, प्रमुख उपस्थिती समीर भाऊ दुधागावकर, डॉ. अशोक जोंधळे, डॉ. भीमराव खाडे, उप प्राचार्य विजय घोडके आणि विद्यार्थी संसदेचे सदस्य हे होते.

'महापुरुषांच्या चरित्र वाचनाने आपले आयुष्य समृद्ध होऊ शकते. विद्यार्थ्यांनी सुसंगती धरावी' असे प्रतिपादन अप्पासाहेब खोत यांनी केले. या वेळी दुधागांवकर साहेबांनी सर्वांना मंगल कामना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. बक्षीस वितरण संचालन प्रा. ऋषभ नालटे आणि प्रा. राहुल अपशेटी यांनी केले. आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.तंजुम यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या